Ad will apear here
Next
एस. एम. जोशी महाविद्यालयात रक्तदान शिबिर
एस. एम. जोशी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात सहभागी झालेले रक्तदाते व मान्यवर

पुणे : ‘रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, एका रक्तदानाने तिघांचे जीव वाचतात. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी रक्तदान करावे,’असे आवाहन झेड प्लस हॉस्पिटलचे डॉ. राहुल झांजुर्णे यांनी केले. रोटरी क्लब, हडपसर सेंट्रल आणि एस. एम. जोशी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगोलकर, तर अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे सदस्य दिलीप (आबा) तुपे होते.

या वेळी बोलताना सांगोलकर म्हणाले, ‘रस्ते अपघातात हजारो लोकांचे बळी जातात, हजारो लोक अपंग होतात. त्यात बराच मोठा वाटा दुचाकी वाहनांच्या अपघातांचा आहे. त्यातही डोक्याला मार लागून अपघातग्रस्त होणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. ते टाळण्यासाठी दुचाकी वाहन वापरणाऱ्यांनी हेल्मेट घालणे आणि चारचाकी वाहने वापरणाऱ्यांनी सीट बेल्ट लावणे अत्यावश्यक आहे.   याबरोबरच वाहन चालवताना मोबाइलचा वापर करू नये, मद्यपान करून वाहन चालवू नये, सिग्नल तोडू नयेत’.

‘मानवी जीवन हे अत्यंत अनमोल आहे, याची सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वांनीच कृतज्ञतेची जाणीव ठेवली पाहिजे. त्यामुळे कोणत्याही सामाजिक कार्यात तरुणांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे,’ असे मत दिलीप तुपे यांनी व्यक्त केले.

या वेळी ५० वेळा रक्तदान करणारे प्रवीण पुजारी यांचा सत्कार करण्यात आला. पूरग्रस्तांसाठी गरजेच्या कपडे, अन्नधान्य, वस्तू यांचेही संकलन या वेळी करण्यात आले. या कार्यक्रमाला महेंद्र लुणीया, संपतराव खोमणे, सचिन तुपे, रंजन पराडकर, शारदा लुणीया, तरुण मित्तल, राकेश रांका, डॉ. वैशाली पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.  

प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रंजना जाधव व प्रा. स्नेहा मुळे यांनी केले. डॉ. शरद पासले यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZRGCD
Similar Posts
एस. एम. जोशी महाविद्यालयात आयडिया लॅबचे उद्घाटन पुणे : ‘आजचे युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे व नाविन्यपूर्ण संशोधनाचे युग आहे. आयडिया लॅबसारख्या अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या कल्पनांना वास्तव रूप मिळण्याचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. यामुळे विविध क्षेत्रातील कल्पनांना मूर्त रूप प्राप्त होऊ शकते. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन वैज्ञानिक डॉ
एस. एम. जोशी महाविद्यालयात कारगिल विजय दिन साजरा पुणे : हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालयात कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला. या वेळी कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले, प्राध्यापकवर्ग, एन. सी. सी. छात्र व विद्यार्थी यांनी आदरांजली वाहिली. या वेळी झालेल्या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले यांनी मार्गदर्शन केले
‘वृक्षसंवर्धन काळाची गरज’ पुणे : ‘वृक्षांमुळे मानवी जीवन आरोग्यदायी बनते. प्रदूषण कमी करण्यासाठी वृक्षसंवर्धन आवश्यक आहे. वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. राष्ट्रीय सेवा योजना हा विभाग सामाजिक बांधिलकी व राष्ट्रीय एकात्मतेचा संस्कार देणारा विभाग आहे,’ असे प्रतिपादन प्राचार्य. डॉ. अरविंद बुरुंगले यांनी केले.
डॉ. अरविंद बुरुंगले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान पुणे : रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव आणि एस. एम. जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले यांनी केलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन, अरुण दादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language